सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोकल गाडीची धडक लागून तीन अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती घटनांची नोंद करण्यात आली असून तिन्ही मृत व्यक्तींच्या वारसांचा शोध वाशी रेल्वे पोलिस शोध घेत आहेत.
पहिल्या घटनेत, दि.15 मे रोजी सायंकाळच्या सुमारास सानपाडा ते जुईनगर रेल्वे स्टेशन कि.मि. नं. 30/4-6 जवळील लोकलची पटरी ओलांडत असतांना अज्ञात हिंदु पुरुष जखमी झाल्याने त्यास महिला पोलिस शिपाई शिंदे यांनी उपचारासाठी प्रथम मनपा हॉस्पिटल वाशी व नंतर सायन हॉस्पिटल मुंबई येथे दाखल केले असता, उपचारा दरम्यान दि. 23 मे 2021 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. यातील मृत व्यक्तीची उंची 5 फुट 4 इंच असून अंगाने सडपातळ, रंगाने काळा सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, असून त्याने अंगात सफेद रंगाचा फुल बह्याचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केली आहे.
दुसर्या अपघाती घटनेत, दि.30 मे रोजी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास यातील अज्ञात व्यक्ती वाशी ते मानखुद रेल्वे स्टेशन दरम्यान कि.मी.नं. 19/25 जवळील लोकल पटरी ओलांडत असतांना अप पनवेल 138 या लोकल गाडीची ठोकर लागून सदर व्यक्ती जखमी झाल्याने त्यास महिला पोलिस शिपाई राउत यांनी उपचारासाठी सायन हॉपिटल मुंबई येथे दाखल केले असता, दि.31 मे 2021 रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उंची 5 फुट 5 इंच, अंगाने मयम, रंगाने सावळा, चेहरा गोल, नाकसरळ, डोळे बंद, डोकचे केस काळे, दाढी काळी असून त्याने अंगात अंगात काळ्या रंगाचा मळकटलेला फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पँट परिधान केली आहे. सदर दोन्ही व्यक्तींचे तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक ए.सी.आढाव हे आहेत.
तर तिसर्या अपघाती घटनेत, दि. 11 जून 2021 रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्ती गोवंडी ते मानखुर्द रेल्वे स्टेशन दर2यान कि.मी.नं. 18/04 ते 18/15 जवळील लोकलची पटरी ओलांडत असतांना त्यास अज्ञात लोकल गाडीची ठोकर लागून तो जखमी झाल्याने त्यास पोलिस हवालदार वाकोडे यांनी उपचारासाठी मुंबईतील राजावाडी हॉपिटल येथे दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. उंची 5 फुट 6 इंच, अंगानेसड पातळ, रंगाने- निमगोरा, चेहरा-उभट, नाक-सरळ, डोळे बारीक, डोकचे केस वाढलेले काळे, दाढी मिशी काळी असे त्याचे वर्णन असून त्याने अंगात निळसर रंगाचा निळे उभ्या पट्टे असलेला हाफ बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्सपँट परिधान केली आहे. तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक एम.एस. घरटे हे आहेत.
दरम्यान, उपरोक्त तिन्ही घटनांतील मृत हिंदू व्यक्तींच्या वारसाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिस हवालदार श्रीकृष्ण वेदपाठक यांच्याशी भ्रमणध्वनी क्र.9870157850 येथे संपर्क साधावा असे आवाहन वाशी रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Be First to Comment