सिटी बेल | पनवेल | मनोज पाटील |
रक्तदानाची जागरुकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्यासाठी जगभर १४ जून जागतिक रक्तदाता दिन साजरा होत असतो, आणि ह्याच दिनाचे औचित्य साधून उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण एकनाथ मढवी यांनी पनवेल येथील श्री. साई ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करुन सर्वप्रथम जागतिक रक्तदाता दिनाचे संकल्प पूर्ण केले. तसेच सर्वांनी या दिनाचे औचित्य साधुन रक्तदान चळवळीमधे सक्रीय होण्याचा संकल्प करावा असेही आवाहन किरण मढवी यांनी केले.

यावेळी त्यांना रक्तदात्याचे प्रमाणपत्र श्री. साई रक्तपेढीचे प्रमुख सुनिल पाटील आणि रायगड भुषण मनोज पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
त्यांनतर किरण मढवी यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांना प्रत्यक्ष भेटून उलवेनोड परिसरातील नागरिकांना हाकेच्या अंतरावर रक्त सहज उपलब्ध होण्यासाठी आणि अनेक रक्तदात्यांना आरोग्यसेवेकरिता रक्तदान करण्यासाठी कायमस्वरुपी रक्तपेढी व्हावी याकरिता तहसिलदार श्री. तळेकर यांच्या कडे मागणी पत्र देण्यात आले.








Be First to Comment