Press "Enter" to skip to content

स्मार्ट सिटीतल्या जुन्या-जर्जर इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटणार कधी..?

सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |

 

कळंबोलीसह, खारघर, नविन पनवेल, खांदा कॉलनी आदी ठिकाणी सिडकोचे निकृष्ट दर्जाची बांधकामे झाली आहेत. असा जुन्या-जर्जर, धोकादायक इमारतींचे स्लाप कोसळण्याच्या घटना वारंवार होत आहेत.यात अनेक जान गंभीर जखमी झाले आहेत. या गंभीर समस्येवर सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे , सिडकोवर मोर्चे काढले, स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे साठी रास्ता रोको आंदोलन केले, या जुन्या जर्जर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येवून त्या धोकादायक राहण्यास लायक नसल्याचे सिडकोने इमारतीवर फलक लावले आहेत.  मग सिडको/महापालिका या जुन्या जर्जर इमारतीचा तोडगा काढणार कधी ?


मुंबई, ठाणे, ठाकुर्ली, मुंब्रा मध्ये इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या,या दुर्घटनामध्ये अनेकांचे जीव गेले ? तसे पनवेल महानगर पालिका, सिडको क्षेत्रातील धोकादायक इमारती खाली येवून जीवीत हानी झाल्यानंतर  उपाय योजना करणार का ? गेली अनेक वर्षापुर्वी येथील इमारतीना धोकादायक, राहण्यास योग्य नसल्याचे फळक लावण्यात आले आहेत पण यांचा पुर्नविकास यावर कोणताही निर्णय होत नसल्याने रहिवासीमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

उपरोक्त विषयाला अनुसरुन शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित सिडको व महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन या धोकादायक व जुन्या जर्जर इमारतीच्या बाबात तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

याबाबत प्रातिनिधिक प्रतिक्रिया…

कठोर कारवाई करा... 

गेल्या काही वर्षांपासून सिडको वसाहती मध्ये इमारतींचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची अनेक उदाहरणे आपण पहात आहेत.त्यामुळे अशी बांधकामे करणाऱ्या बिल्डरांवर जो पर्यंत कारवाई होत नाही,तो पर्यंत या घटना थांबणार नाहीत.यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.. 

- प्रदीप ठाकुर

नियम पाळणे सक्तीचे करा…

मुंबईसह सिडको वसाहती मध्ये अनधिकृत इमारती बांधणे जोवर बंद होत नाही, तोपर्यंत या घटना घडणारच!  लक्षीच्या दर्शनाने सिडको व पालिका अधिकारी अनधिकृत बांधकामाना प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे इमारत बांधताना काटेकोरपणे नियमांचे पाळण होत नाही. अनधिकृत बांधकामे चालू आहेत व झाली आहेत अशा अधिका-यावर कारवाई झाली तर अनधिकृत बांधकामावर नियंत्रण येवून. इमारत कोसळण्याच्या दुर्घटना होणार नाहीत. केवळ इमारत उभारतानाच नाही तर,त्या  इमारतींच्या देखभाल करणे हे ही बंधनकारक करणे आवश्यक असणार आहे… 

– आत्माराम गावंड

सरकारची भूमिका महत्त्वाची...

गेल्या अनेक वर्षांपासून इमारती पडण्याच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून  येत आहे. मुळात हे थांबविण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. बिल्डरवर कठोर कारवाई करणे बंधनकारक आहे. अन्यथा बिल्डरांना सध्या मोकळे रान असल्याने अशा घटना भविष्यातही होतच राहतील...

- गिरीश धुमाळ
बिल्डरांवर कारवाई करा...

बेकायदा बांधकामे करणारांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत या दुर्घटना थांबणार नाही.कारवाईच्या भीतीपोटी तरी बिल्डर चांगले बांधकाम करतील.या मध्ये सिडको/पालिकेची जबाबदारी ही सर्वात महत्त्वाची आहे.

- सौ.ज्योतीताई मोहिते
सामाजिक कार्यकर्त्या
स्ट्रक्चरल ऑडिट हवे...

इमारती कोसळण्याच्या घटना थांबवायच्या असतील, तर इमारत बांधल्या पासून प्रथम पंधरा वर्षांनी व नंतर प्रत्येकी पाच वर्षांनंतर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनमान्य वास्तू विशारद/सल्लागार ( कन्सल्टंट ) यांच्या मार्फत होणे गरजेचे आहे.जेणे करुन त्या इमारतींची अवस्था आपल्या समोर येऊ शकते. त्यामुळे हा नियम बंधनकारक करावा. यासाठी सिडको/पनवेल महानगर पालिकेची भुमिका महत्वाची आहे... 

- कृष्णकांत कदम

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.