सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा गणपत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्या ११०० बेडच्या कोविड सेंटरला भेट देऊन कोविड रुग्णांची चौकशी करुन तेथील परिस्थिती जाणून घेतली.

यावेळी दिपक दादांनी कोविड रुग्णांना दिलासा देत त्यांना अन्नदान व सॅनिटायझर तसेच २१ हजार रुपयांचा धनादेश आमदार निलेश लंके यांच्याकडे सुपूर्द केला.आमदार निलेश लंके यांनी ११०० बेडचे कोविड सेंटर उभारुन मोठे समाजहिताचे काम केले आहे. याबद्दल कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने संस्थापक दिपक दादा गणपत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांना कोरोनायोध्दा सन्मानपत्र देऊन त्यांच्या समाजसेवेचा गौरव केला.

कोविड रुग्णांना या सेंटरमध्ये सर्व सुखसोयी मिळत असल्याने दिपकदादांनी आमदार निलेश लंके यांचे खरे देवमाणूस म्हणून आभार मानले.तर दिपकदादांकडून कानसा वारणा फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना पाश्र्वभूमीवर राज्यभर चाललेल्या मदत कार्याची आमदार निलेश लंके यांनी स्तुती केली.यावेली कानसा वारणा फाउंडेशनचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष राकेश पवार,सागर सानप,आदीत्य चकणे आदी उपस्थित होते.








Be First to Comment