तिसरा पंच *ती*
त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.. ती होती एका श्रीमंत व्यक्तीची एकुलती एक मुलगी आणि तो होता एक अयशस्वी कवी.. एके दिवशी जे व्हायचे तेच झाले..
” तुझ्या कविता मला खूप आवडतात रे, पण कवितेने थोडीच पोट भरतं”
असे म्हणून ती त्याला एकटं सोडून गेली..
तो पुढे प्रसिद्ध कवी झाला .. त्याच्या काव्यसंग्रहाला मोठे पारितोषिक मिळाले.. त्याच्या काव्यसंग्रहाचे नाव होते ती
त्याला मुलगा नाही म्हणून त्याचे नातेवाईक नेहमी त्याला अजून प्रयत्न कर म्हणून सांगत असत.. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा .. वृद्धत्वाची काठी, आणि मुलगी परक्याचे धन असे त्याला अनेकांनी ऐकवले होते..
त्याची मुलगी मोठी झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली… आणि
एके दिवशी
” आई, राहू दे ग पैसे, बाबांच्या औषधांसाठी कामी येतील.. मुलगी म्हणून माझे कर्तव्य आहे की नाही?”
हॉस्पिटलमध्ये मुलगी आईला म्हणाली.. आणि रडणाऱ्या आईला जवळ घेऊन थोपटले..
आता वडाच्या पारंबीनेच वडाला आधार दिला.
शेखर अंबेकर, आदई
Be First to Comment