Press "Enter" to skip to content

वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

आपल्या हक्क मिळविण्यासाठी संघनेने रस्त्यावर उतरणे आवश्यक असून आपली ताकद दाखवावी लागेल- उदय दळवी

सिटी बेल |कळंबोली | विकास पाटील | 

आपली ताकद दाखविण्यासाठी आणि आपले हक्क मिळविण्यासाठी  आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल, आपला आवाज मंत्रालय, सबंधित प्रशासन विमा कंपन्या,  फायनान्स बँक पर्यत पोहचविण्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल, आपल्या मागण्या या आपला हक्क आहे तो घेण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. टोलनाका,  राज्याच्या सिमा,  पालिस यंत्रणा यापासून आपल्याला मोठा त्रास होत आहे  यापासून सुटकारा होण्यासाठी आपण एकसंघ लढले पाहिजे असा सल्ला शिवसेना  महाराष्ट्र वाहतुक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी दिला.  


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन काळात सर्व उद्योग धंदे बंद असल्याने वाहतुकदार अनेक समस्याने त्रस्त आहेत. यात अनेक ट्रान्सपोर्टराना ब्लड प्रेशर, डायबिटीज, हायअँटक सारखे आजार जडले आहेत. लाँकडाऊनच्या काळात सगळे धंदे ठप्प असल्याने वाहतुकदार काकुलतीला आला असून जगावा कसे या एकाच विचारात असताना बँक फायनान्सने नाकीनऊ आणले आहे. या वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी  मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बिमा कॉम्प्लेक्स कळंबोली येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी दळवी बोलत होते. 

  

ते पुढे म्हणाले की, सरकार आपले आहे त्यामुळे आपण आपला हक्क घेवू शकतो पण त्यासाठी सर्व ट्रान्सपोर्टर संघटनांची एकी महत्वाची आहे. त्यासाठी आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले  यावेळी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र गव्हर्मेटची २४ तास आँनलाईन सेवा सुरू करण्यात यावी ती आता फक्त २ तासच चालू असते. लाँकडाऊन काळातील गाड्याच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावा. ODC  कार्गो आँनलाईन घेण्यात यावा. परमिटसाठी गाडी उभी असेल तर  दंड आकारण्यात येवू नये, फँक्टरी ते पार्किंग दरम्यान सवलत देण्यात यावी. उभ्या गाडीवर चार पट्टीने दंड आकारला जातो तो बंद करण्यात यावा,  लाँकडाऊन काळात रोड टँक्सला सवलत द्यावी,  तसेच त्यावर व्याज लावण्यात येवू नये, एक्सप्रेसवर लेन कटिंग दंडावर सवलत देण्यात यावी, स्लो गाडी जात असेल तर तीला ओव्हरटेक करून जाताना लेन कटिंग करून जावे लागते त्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडावर सवलत देण्यात यावी. डिझेलच्या वाढीव भावाप्रमाणे गाडीच्या भाड्यात वाढ होत नाही मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात यावेत . राज्यात सर्वात जास्त टोळ व आरटीओचा दंड असल्याने तो कमी करण्यात यावा या महत्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.  


 महाराष्ट्र वाहतूक सेने तर्फ बिमा कॉम्प्लेक्स कलंबोली येथे वाहतूकदार सदस्य नोंदणी व लाँकडाउन काळातील समस्या बाबत मार्गदर्शन शिबीर रायगड जिल्हा अध्यक्ष म वा सेना  श्री महेश गुरव व रायगड जि.उपाध्यक्ष म वा सेना श्री बापू ढेंबरे  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिवसेना पनवेल महानगरप्रमुख  रामदास शेवाळे, अशोक टाव्हरे  ( महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म वा सेना ), सौ .सुवर्णा ताई वाळुंज (म वा सेना महिला सघंटिका), विलास कामोटकर ( सचिव म वा सेना ), गोविंद साबळे उपाध्यक्ष म.वा.से., सतीश पाटील उपाध्यक्ष म.वा.सेना., पी एस मुंगाजी (जिल्हाकार्याअध्यक्ष (म वा सेना उरण विधानसभा ) , नामदेव घुले जिल्हा उपाध्यक्ष ,नारायण फडतरे जिल्हा सचिव, तुकाराम सरक (अध्यक्ष म वा सेना पनवेल) विवेक गडकरी अध्यक्ष कळंबोली शहर, आदीसह मोठ्या संख्येने  वाहतूक सभसद उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.