Press "Enter" to skip to content

तालूका पोलिसांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

स्माईल फौंडेशन व ब्लू लाईन फौंडेशन यांच्या माध्यमातून वाटप  

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

स्माईल फौंडेशन व ब्लू लाईन फौंडेशन यांचे माध्यमातून पनवेल तालूका पोलिसांनी आदिवासी वाड्या येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.         

यावेळी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत फणसवाडी (भाताण), पो. आजीवली, ता. पनवेल ही आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 45 आदिवासी कुटुंबे राहतात. सध्याचे कोरोना महामारी मध्ये तेथील आदिवासी लोकांना सध्या रोजगार नाही. त्यामुळे सदर आदिवासी वस्ती वरील एकूण 45 कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके तांदूळ, साखर, डाळ, तेल, कांदे व इतर किराणा असे साहित्यांचे वाटप स्माईल फौंडेशन व ब्लू लाईन फौंडेशन यांचे माध्यमातून पोलीस उप आयुक्त, परि-2, पनवेलचे शिवराज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फणसवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अशा कठीण प्रसंगी केलेल्या मदतीमुळे तेथील सर्व आदिवासी लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.         

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.