Press "Enter" to skip to content

उलवे येथे माजी शिक्षकांनी केला जागतिक पर्यावरण दिन साजरा

सिटी बेल | उलवे |मनोज पाटील |

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जणजागृती निर्माण करणे यासाठी जगभरात अनेक देशात दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असल्याने उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या मार्फत उलवे सेक्टर २४ श्री. हनुमान मंदिर तलाव परिसरात स्वच्छता अभियान हाती घेवुन आणि तेथील परिसरात आंबा, कडुलिंब, करंज, जांभुळ आणि काजू अशा देशी वृक्षांची निवड करुन आपल्या गावातील माजी शिक्षकांच्या शुभहस्ते रोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

संस्थेच्या माध्यमातून तलाव परिसरात विविध वृक्ष लागवडीचे कार्य चालुच असुन काही दिवसांतच तेथील मोकळ्या जागी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी व्यक्त केले.

यावेळी आदर्श शिक्षक मो. का. मढवी गुरुजी, ना. रा. गायकवाड गुरुजी, काशिनाथ तेलंगे गुरुजी, दत्तात्रेय कोळी गुरुजी, आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.