Press "Enter" to skip to content

वडघर ग्रामपंचायीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड

रस्त्याचे काम न करताच लाखो रुपये लाटले : पहा सिटी बेल चा ग्राउंड झीरो रिपोर्ट

भ्रष्टाचाऱ्यांना शासन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : माजी सरपंच जयवंत परदेशी उर्फ आमदार

सिटी बेल | पनवेल |

वडघर ग्रामपंचायत हद्दीतील भ्रष्टाचाराचे एक प्रकरण माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते जयवंत परदेशी उर्फ आमदार यांनी बाहेर काढले आहे. कुठल्याही स्वरूपाचे काम न करता तब्बल 2 लाख 94 हजार रुपये लाटण्याचा हा प्रकार प्रथमदर्शनी दिसून येतो. अशाप्रकारे अनेक प्रकरणांतून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा जयवंत परदेशी यांचा दावा आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शासन करण्यासाठी गरज पडल्यास कोर्टाचे दरवाजे ठोठावेन अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर भ्रष्टाचाराची सारी प्रकरणे उकरून काढण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सीआयडी चौकशी लावण्याची ते लवकरच मागणी करणार आहेत.

याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की, ग्रामपंचायत वडघर हद्दीतील चिंचपाडा शील येथे अरविंद पाटील यांचे घर ते नरेश परदेशी यांच्या घरापर्यंत रस्ता बांधण्याचे काम साल 2020- 21 च्या चौदाव्या वित्त आयोगानुसार ग्रामनिधी मधून करण्याचे योजले गेले.त्यास्वरुपाचा ठराव देखील झाला.त्यासाठी 2 लाख 94 हजार 144 रुपयांचा निधी खर्च केला गेला.हे काम शाम बबन पाटील या ठेकेदारास दिले गेले.परंतु आजमितीला येथे कुठलाही रस्ता अस्तित्वात नाही.मूळ वहिवाट स्वरूपातील कच्ची पाय वाट अजून तशीच्या तशी आहे.त्यावर रस्त्याचा लवलेश सुद्धा दिसून येत नाही.त्यामुळे कुठलेही काम न करता बिले काढण्याचा प्रकार याठिकाणी झाला असल्याचा आरोप जयवंत परदेशी यांनी केला आहे.

भ्रष्टाचाराच्या या व यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये सरपंच रविकांत कमलाकर भोपी,प्रदीप तुकाराम मुंडकर पंचायत समिती चे बांधकाम विभागातील अभियंते मंगेश सावंत आणि ग्रामसेवक दगडू उत्तम देवरे हे गुंतले असून त्यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा अपहार वडघर ग्रामपंचायतीमध्ये केल्याचा आरोप जयवंत परदेशी यांनी केला.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच या सारख्या अन्य भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना उजेडात आणण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याची भूमिका जयवंत परदेशी यांनी मांडली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.