खचलेल्या महामार्गावरील खड्डा बनला असता प्राणघातक अपघाताचे कारण
सिटी बेल | पनवेल |
राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल महानगरपालिका जिल्हाअध्यक्ष नगरसेवक सतिश पाटील यांच्या समय सूचकतेमुळे प्राणघातक अपघात टळले आहेत.यात जिवीत हानी होण्याची शक्यता होती.
सायन पनवेल महामार्गावर मॅकडोनाल्ड समोर तीन फूट बाय 4 फुटाचा साधारण 30 फूट खोल खड्डा पडला होता.रस्ता खचल्याने निर्माण झालेला हा खड्डा कोणाच्या निदर्शनात येत नव्हता.या महामार्गावर वाहने वेगाने येत असतात.अशा वेळेस अचानक आलेल्या खड्ड्यात चाक जाऊन प्राणघातक अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सतिश पाटील यांनी तातडीने या ठिकाणी दगड,फांद्या लावून वेगाने येणाऱ्या गाड्यांना सतर्क करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वतः त्या ठिकाणी उभे राहून ते वाहनांना मार्गदर्शन करू लागले. येथून त्यांनी वाहतूक शाखेचे परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते परदेशी, प म पा चे अभियंते यांना फोन करून रस्ता खचल्याचे कळविले.

वाहतूक शाखेचे कर्मचारी येईपर्यंत सतीश पाटील त्या ठिकाणी स्वतः वाहनांना मार्गदर्शन करत होते. सतिश पाटील यांनी तातडीने पाठपुरावा केल्यामुळे अवघ्या दोन तासात खड्डा भरून रस्ता पूर्ववत करण्यात आला.








Be First to Comment