Press "Enter" to skip to content

पनवेल परिसरातील पत्रकारांना लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे पमपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सतीश पाटील यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

सिटी बेल | पनवेल |

पनवेल परिसरातील पत्रकारांना लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पमपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सतीश पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली निवेदनाद्वारे केली आहे.

सतीश पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या मार्च महिन्यापासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण सुरू आहे. एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. मनपा प्रशासनाने केलेल्या या व्यवस्थेबाबत प्रशासकीय प्रमुख म्हणून आपले जाहीरपणे आभार. परंतु हे करीत असताना पनवेल परिसरातील पत्रकारांना लसीकरणा मध्ये प्राधान्यक्रम देण्यात येत नाही. ही बाब जरा खेदजनक आणि चिंता व्यक्त करणारी आहे.

आपणास ठाऊकच आहे की पनवेल चे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांपर्यंत बातम्या पोचवण्याचे माध्यम म्हणून महत्वाचे काम करीत आहेत. महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या सूचना आणि प्रेस नोटची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारांकडून केले जाते. हे सर्व बांधव सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर त्यांच्या परिवाराची जबाबदारी आहे. या सर्व अनुषंगाने पनवेल च्या सर्व पत्रकार बांधवांना फ्रन्टलाइन वर काम करणारे म्हणून त्यांना त्वरित कोरोना लस देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी न्याय्य मागणी प्राधिकृत अधिकारी म्हणून आपणाकडे करीत आहे. याबाबत आपण त्वरित कार्यवाही कराल असा आशावाद व्यक्त करतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.