गांधी-नेहरू यांच्या काळापासून भारतात खोटा इतिहास शिकवण्याचे तंत्र आजतागायत चालूच ! – श्री. शंकर शरण, ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा देतांना क्रूर मोगल आक्रमकांना चांगले म्हणण्यास प्रारंभ केला. त्यांचे उदात्तीकरण केले. जेणेकरून मुसलमान खुश होऊन स्वातंत्र्यलढ्यात एकत्र सहभागी होतील; परंतु यानिमित्ताने खोटा इतिहास सांगण्यास प्रारंभ झाला. स्वातंत्र्यानंतर सोव्हिएत कम्युनिस्टांच्या प्रभावामुळे देशातील शिक्षणामध्ये हिंदू धर्माला त्याज्य ठरवले गेले. गांधी-नेहरू यांच्या काळापासून चुकीचा इतिहास लिहिणे चालू केले गेले. त्यातून डाव्या विचारसरणीचे अर्थात् हिंदूविरोधी विचार लोकांवर लादले जाऊ लागले.
हिंदूविरोधी इतिहास हा अनेक दशकांपासून शिकवला जात आहे. सध्याच्या शिक्षणातही हिंदूविरोधी आणि देशविरोधी सूत्रे चांगली म्हणून शिकवण्यात येत आहेत, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक श्री. शंकर शरण यांनी केले आहे. ते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘सेक्युलर शिक्षण कि हिंदुविरोधी प्रचारतंत्र’, या ‘ऑनलाईन परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर 2853 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.
या वेळी *‘भारतीय शिक्षण मंच’चे अखिल भारतीय संयोजक श्री. दिलीप केळकर* म्हणाले की, जेएन्यू, आणि अलिगड मुस्लिम विश्वविद्यालय यांमध्ये भारतविरोधी घोषणांसह स्वा. सावरकर अन् स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना होण्यामागील मूळ कारण ‘संपूर्ण जीवन अभारतीय असणे’, हे आहे. त्यामुळे आपल्याला शिक्षणासह न्याय, उद्योग, कला अशा सर्वच क्षेत्रांत भारतीय जीवन पद्धती आणायला हवी. तर *‘मध्य प्रदेश साहित्य अकादमी’चे संचालक श्री. विकास दवे* म्हणाले की, ‘‘सा विद्या या विमुक्तयेे !’ म्हणजे जे शिक्षण मुक्ती देते, तेच खरे शिक्षण आहे. आपल्या ऋषी-मुनींनी आंतरिक ज्ञानाला प्रकट करण्याची शिक्षणपद्धती चालू केली होती. त्या शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून आज आपण भरकटलो आहेत. चांगली व्यवस्था प्रस्थापित करायची असेल, तर लहानपणापासून धर्माचे शिक्षण देणे हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे.’’
या वेळी बोलतांना ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, भारतीय राज्यघटना तर प्रस्तावनेत सर्वांना समानतेचा हक्क देते; मात्र प्रचलित शिक्षणामध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्यामध्ये भेद आणि असमानता आहे. राज्यघटनेच्या कलम 28 अनुसार कोणत्याही धार्मिक शिक्षणाला सरकारी अनुदान देता येत नाही. त्यामुळे बहुसंख्यांकांना (हिंदूंना) आपल्या धर्माचे शिक्षण देत येत नाही; मात्र कलम 30 नुसार अल्पसंख्यांकांना (मुसलमानांना) त्यांच्या धर्माचे शिक्षण सरकारी अनुदानातून देता येते. हा सरळ सरळ धर्माच्या आधारे भेदभाव केला जात आहे, आणि तो मिटवला पाहिजे








Be First to Comment