Press "Enter" to skip to content

गोरगरीब लोकांना बिस्किट सॅनिटायजर व मास्कचे वाटप

सिटी बेल । कळंबोली । विकास पाटील । 

भाजपच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सिंग सिटी हाँस्पिटल जवळील झोपडपट्टी मधील गोरगरीब लोकांना बिस्किट शानिटायजर व मास्क चे वाटप करण्यात आले.

यावेळी कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील, भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, मंडल सरचिटणीस दिलीप बिस्ट, व्यापारी मोर्चाचे मण्डल अध्यक्ष कमल कोठारी, उत्तर भारतीय मोर्चाचे केशव यादव, डॉक्टर कुरुंद इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

       कोरोना महामारीने हातावर पोट असलेल्याचे रोजगार ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाली आली आहे  असा कळंबोली येथील सिडको कार्यालय व सिंग सिटी हाँस्पिटल जवळ असलेल्या झोपडपट्टीमध्ये  राहणारे गोरगरीब व भटकंती करणारे मोल मजूर यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे यांचा संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यापारी मोर्चाचे कळंबोली मंडल अध्यक्ष कमल कोठारी मंडळ सरचिटणीस दिलीप बीस्ट, भटके-विमुक्त आघाडी कळंबोली मंडळ अध्यक्ष आबासाहेब घुटुकडे उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेच्या मुखात अन्नाचे चार घास जावेत व कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. पनवेल तालुक्यातील संपूर्ण जनता लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.