सिटी बेल । कळंबोली । विकास पाटील ।
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने पालेखुर्द, चिंध्रण येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटात देशात राज्यात लाँकडाऊन घोषित करून कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न आहे यात यश येत आहे पण या लाँकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत त्यामुळे कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे अशा बिकट परिस्थितीत लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर यांनी येखील जनतेला दिलासा देताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील निराघार, गोरगरीब गरजू जनतेला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील पालेखुर्द गावातील गरजूंना भाजपचे नेते गौरव भोईर यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले








Be First to Comment