साई मंदिर वहाळ येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा व वृक्षारोपण संपन्न
सिटी बेल । उलवे ।
एन.आर.आय.सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील ह्यांच्या वाढदिवसानिमित्त साई मंदिर,वहाळ येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आज आयोजित केला होता
साईंच्या चरणी आशिर्वाद घेऊन त्यांचा योग्य मानसन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी सेक्टर ९ येथे वृषरोपण कार्यक्रमाला सुद्धा भेट दिली.


यावेळी महावीर इंटरनॅशनल नवी मुंबई व स्थानिक रहिवाशी ह्यांच्या वतीने सेक्टर ९ मध्ये प्लॉट नंबर ६७ येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एन.आर.आय.सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील ,एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे, साई देवस्थान संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे अध्यक्ष शिरीष कडू, ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, रोटेरियन अजय दापोलकर,सुयोग खरे,शेखर काशिद उपस्थित होते.


वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज आहे तसेच तापमान,प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले पाहिजे असे रवींद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात तरुणांनी व वरिष्ठ नागरिक ह्यांनी सहभाग घेतला होता. वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार सर्वांनी केला.


डॉ अनिल छाजेड-चेअरमन(महावीर इंटरनॅशनल नवी मुंबई),नरेश संघवी,दिनेश बाबेल,अरविंद खाटेड,
सुरेश बाफना-सेक्रेटरी,तसेच मनोजकुमार मोर्याजी,सचिन आवटे,निलेश म्हादे व इतर सभासद ह्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.








Be First to Comment