Press "Enter" to skip to content

खांदा वसाहतीतील पाणी प्रश्न पेटला

शिवसेनेची सिडकोसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

खांदा वसाहत व परिसरात गेल्या काही दिवसापासून भेडसावत असलेल्या पाणी प्रश्‍नावरुन शिवसेनेने सिडको कार्यालयासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धडक मारुन पाणी टंचाई संदर्भात जाब विचारला.

पाणी प्रश्‍नावर शिवसेना खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सिडको आणि महाराष्ट्र जीवनप्राधिकरणच्या कार्यालय धडक दिली. यावेळी सिडकोचे सहाय्यक अभियंता राहुल सरोदे  आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता अर्जुन गोळे यांना खांदा वसाहतीमधील पाणी प्रश्‍नावर जाब विचारला त्याच बरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लाईनला लागलेले गळतीचे ग्रहण कधी दूर होणार असे अनेक प्रश्‍न शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारले. त्याचबरोबर खांदा वसाहतीमधील काही सोसायट्याना पाणी टंचाई असल्याने त्यांना टँकर द्वारे पाणी पुरवठा शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

यावेळेस आपण  लवकरात लवकर पाणी  प्रश्‍न मार्गी लावा अशी मागणी केली असता संबंधित अधिकार्‍यांनी लवकरात लवकर पाणी प्रश्‍न मार्गी लावतो असे आश्‍वासन दिले. यावेळी उपशहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख संपत सुवर्णा, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, उपशहर संघटक प्रकाश वानखेडे, उपशहर संघटक संजीव गमरे, उपविभाग प्रमुख चंद्रगुप्त साळवी, उपविभाग संघटक सुनिल महामुनी, उपकार्यालय प्रमुख नागम सर, शाखाप्रमुख मंगेश पवार, उपशाखाप्रमुख भास्कर साळवी, उपशाखाप्रमुख गणेश साबळे,गट प्रमुख सुवरे  शाखा अधिकारी सौरभ  महामुलकर, शाखा अधिकारी ऋषिकेश घुले, जेष्ठ शिवसैनिक प्रकाश घाडीगावकर, प्रबोधन   सोसायटीचे सदस्य बाबासाहेब शिंदे, मंगेश घुरण, विनायक मोरे, प्रदीप माने व शिवसैनिक  उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.