Press "Enter" to skip to content

एक गोड दिवस कोविड योध्यांसोबत

सिटी बेल । नवी मुंबई ।

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष ग़ज़ानन काळे यांच्या मार्गदर्शानाख़ाली NRI पोलिस स्टेशन मधील पोलिसांसाठी रसगुल्याचा तसेच गुलाबजाम १२५ किलो चा बेत करण्यात आला होता.

विद्यार्थी सेना शहर सहसचिव ओंकार दिलीप गंधे, स्थानिक प्रतिनिधी स्वाती भोईर विद्यार्थी सेना उपविभाग अध्यक्ष हितेश बडेकर, शाखा अध्यक्ष भावेश भोईर, उपशाखा अध्यक्ष श्रुतिक पुगावकर, रोहन गंधे, इम्तियाज उस्मानी, हर्षल जाधव यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते.

बेलापूर मनसे विभागाच्या पुढाकारामुळे अमितसाहेबांचा वाढदिवस गोड वातावरणात पोलिसांसोबत तसेच सफाई कामगारांसोबत साजरा करता आला.

NRI पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सचिन बोठे व इतर सर्व पोलिस बांधव व महिला कर्मचारी, ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशेलकर आणि त्यांच्या टीमचे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सहकार्याबद्दल आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.