सिटी बेल । कुडाळ / मालवण ।
कोरोना महामारीमुळे आर्थीक समस्येत सापडलेल्या दशावतार २०० कलाकारांना शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी मदतीचा हात पुढे केला असून काल कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात कोकणातील लोकप्रिय खासदार विनायक राऊतजी यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे आपल्याला लॉकडाउनचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक उत्सव , पूजा , जत्रा व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे दशावतार कलाकारांना आर्थीक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवसेना व कोकण यांचे नाते जिव्हाळ्याचे आहे व याच भावनेतून शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांच्या पुढाकारातून २०० दशावतार कलाकारांना धान्य वाटप करण्यात आले.

डॉ मनीषा कायंदे यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जनहितार्थ खारीचा वाटा उचलला असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी दत्तमाऊली पारंपारिक दशावतार मंडळातील सर्व कलाकारांनी खासदार विनायक राऊत व आमदार डॉ मनीषा कायंदे यांचे आभार मानले.








Be First to Comment