Press "Enter" to skip to content

राज्य शासनामार्फत 4 लाख रूपये व अन्य धान्य देण्यात येणार

काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली गागोदे येथील मृत्यु झालेल्या कुटुंबीयांची भेट

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

कोकणासह रायगड जिल्ह्याला बसलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात पेण तालुक्यातील गागोदे आदिवासी वाडी येथील रामा बाळू कातकरी वय 80 यांच्या अंगावर झाड पडून मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सीमा कातकरी यात जखमी झाली असल्याने या घटनेची पाहणी करण्यासाठी आज काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यांनी यावेळी सांगितले की, तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले असून घरांचीही पडझड झाली आहे यासह मच्छिमारी करणा-यांना सुद्धा याचा फटका बसला असल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून तात्काळ नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू असून लवकरात लवकर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.नैसर्गिक आपत्तीने या आदिवासी कुटुंबांवर दुःखाचे सावट पसरले आहे ही घटना दुर्दैवी आहे मात्र या कुटुंबाला राज्य शासनाच्या मार्फत लवकरच 4 लाख रुपये आणि अन्य धान्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर, नंदा म्हात्रे, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, पेण शहर अध्यक्ष प्रविण पाटील, सरचिटणीस परशुराम म्हात्रे, सुर्यकांत पाटील निलेश म्हात्रे , चंद्रकांत पाटील, सदानंद म्हात्रे, राजा म्हात्रे, हिद्दायत्ततुला कुवारे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.