Press "Enter" to skip to content

अप्सरा सोनाली कुलकर्णी चे झाले शुभमंगल !

कोण आहे आणि काय करतो ? सोनाली कुलकर्णी चा नवरा ..

वाचा सोनालीच्या लग्नाची गोष्ट तिच्याचं शब्दात !

सिटी बेल । सिने प्रतिनिधी ।

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कुणाल बेनोडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर सध्या कुणाल आणि सोनालीच्या जोडीची चर्चा सुरू आहे. सोनालीचा पती कुणाल नक्की आहे तरी कोण ते जाणून घेऊयात..

सोनालीच्या पतीचं नाव कुणाल बेनोडेकर असून ‘केनो’ या नावानेही त्याची ओळख आहे.कुणाल लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत राहतो. त्याचे कुटुंबीय लंडनलाच राहतात.कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं.त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.

लग्नानंतर आता सोनाली दुबईतच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. शूटिंगनिमित्त ती भारतात येईल, असं समजतंय.सोनाली आणि कुणाल या दोघांवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सोनाली ची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी ..

अब से हम ‘7’ ‘मे’ 👩‍❤️‍👨

Kunal ‘Keno’ Benodekar

So, आम्ही June मध्ये uk ला लग्न करणार होतो
Uk च्या second wave मुळे तारीख पुढे करावी लागली, मग venue च्या availability अनुसार July मधली तारीख ठरली.
लग्नाच्या तयारीसाठी मी March मध्ये shooting संपवून Dubai ला आले,आणि भारतात second wave आली🙈
Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही!
April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला. July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून..
Quarantine, travel restrictions, family साठी असणारी risk, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकार चे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ cancel करायचा निर्णय घेतला.
June चं July होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी July चं May मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.
आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही🙏🏻
आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणाल चे लंडन ला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही…आताच शिक्का मोरतब करून टाकू.
२ दिवसात सगळं ठरवलं.
एका तासात खरेदी आणि १५ mins मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात,
( इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून
( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी)
Marriage Certificate वर sign केलं.
इथे सगळ्या process आणि paperwork मध्ये आम्हाला मदत करणारे Rahul Tulpule Deepali Tulpule यांचे आभार🙏🏻
आमचे foster parents Sachin Narhar Joshi Shriya Joshi 🙏🏻
आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या Madhavi Amdekar Kolumbus International Marriage Bureau for professionals चे ही मनापासून आभार🙏🏻

पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल,
तेव्हा, तिथे, तसं, family & friends बरोबर सगळ्या विधीनिशी आमची dream wedding करूच.
तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या 🙏🏻

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.