Press "Enter" to skip to content

कळंबोलीपोलिसांनी घातली विनाकारण फिरणा-या नागरिकांना लगाम

दंडात्मक कारवाई सोबत आरटिपिसिआर टेस्टचे उगारले शस्त्र 

सिटी बेल । कळंबोली । प्रतिनिधी ।

काही लोकांना कोरोनाची लक्षणे असून सुद्धा कोरोना तपासणी न करता लक्षणे दिसताच घरीच उपचार  करत आहेत त्याचप्रमाणे  लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कळंबोली वसाहत व परिसरात  कमी होत असल्याने नागरिकांच्या मनातील भीती कमी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांचे  विनाकारण इतरत्र वावरणे सुरू झालेले आहे. कळंबोली पोलिस व पनवेल महानगर पालिका वैद्यकीय विभाग नियमित नागरिकांना सुचना देवून बाहेर न पडण्याचे नागरिकांना आव्हान करत असताना सुद्धा मॉर्निग वॉक इ्व्हीनिंग वॉक करणाऱ्या इसम विनाकारण घराबाहेर फिरत आहेत असा ३८ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. 

मास्क न घालणे, विनाकारण फिरणारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई सोबत टेस्ट करण्यात येणार आहे. व टेस्ट मध्ये कोविड पॉसिटीव्ह आढळल्यास थेट इंडिया बुल्स येथे रवानगी करण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत  आहे. 

  कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता असल्याने पोलिस उपआयुक्त, परी-२, पनवेलचे शिवराज पाटील व सहा. पोलिस आयुक्त, पनवेल विभाग नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे क्र-३, नवीन पनवेल च्या  वैद्यकीय अधिकारी श्रीमती विजया लोहारे यांच्याशी समन्वय साधून कळंबोली पोलिस ठाणे हद्दीत  रविवार दिनांक १६ मे रोजी  संयुक्त कारवाईमध्ये शिवसेना शाखा नाक्यावरून प्रवेश करणारे ठिकाणी नाकाबंदी करून  विनाकारण फिरणाऱ्या ३७ लोकांची आरटिपिसिआर टेस्ट करण्यात आलेली आहे. 

सदर कारवाई मध्ये वैदकीय पथकाचे पाच कर्मचारि व पोलीस दलाचे तीन अधिकारी व आठ कर्मचा -यांनी सहभाग घेतला होता. ही कारवाई चालू राहणार असून कोरोना पाँझिटीव येणाऱ्यांना इंडिया बुल या कोरोना सेंटरमुळे रवानगी करण्यात येईल असे वपोनि संजय पाटील यांनी सांगितले. 

कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केल्याने कोरोना पाँझिटीव रिपोर्टर बाहेर येत आहे. या भितीने मोकाट बाहेर फिरणा-यावर नियंत्रण येणार आहे  मोकाट बाहेर फिरणारांवर यापुढे कारवाई केली जाईल  पुढेही मास्क न घालणे, विनाकारण फिरणारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई सोबत टेस्ट करण्यात येणार आहे. व टेस्ट मध्ये कोविड पॉसिटीव्ह आढळल्या त्यांची रवानगी ताबडतोब इंडिया बुल येथे करण्यात येईल ही मोहिम यापुढेही चालूच राहणार आहे  तेव्हा  विना कारण कोणीही घराबाहेर पडू नये व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे

संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कळंबोली  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.