Press "Enter" to skip to content

प्राथमिक शिक्षक परिषदेच्यावतीने आपत्ती निवारण वैद्यकीय साहित्याचे वाटप

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने को वेड आपत्ती निवारण वैद्यकीय मदत वाटप सुरू असताना रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये व शहरांमध्ये कोविड आपत्ती निवारण वैद्यकीय मदतीचे वाटप जोमाने सुरू असताना प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे विविध मान्यवरांच्या हस्ते कोविड आपत्ती निवारण वैद्यकीय मदत साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश कडू ,पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर ,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बसवराज लोहारे उपस्थित होते. सुरुवातीस शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी प्रस्तावनेतून कोविड काळात संपूर्ण राज्यभरात प्राथमिक शिक्षक परिषदेच्यावतीने चालू असलेल्या मदतीचे स्वरूप विषद केले.

यावेळी सुनील साळवी,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी फाळके, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुणा पोहरे, देवेंद्र परांजपे, भगवान मोरे, खैरे, औषध निर्माता अनिल वायकर, समुपदेशक विकास कोंपले आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी प्राथमिक शिक्षक परिषदेचे कोविड काळात चालू असलेल्या मदतीबद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.