Press "Enter" to skip to content

सुकापूर रस्त्याचे काँक्रेटिकरण काम अखेर पूर्ण

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुका चिटणीस राजेश केणी यांनी दिलेला शब्द केला खरा !

सिटी बेल । पनवेल । सुनिल ठाकूर ।

सुकापूरमधील अजिंक्यतारा सोसायटी व नंदकिशोर सोसायटी यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुका चिटणीस राजेश केणी यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असुन या कार्यक्रमाचं भूमिपूजन तालुका चिटणीस राजेश केणी, स्वप्नील भुजंग( पंचायत समिती सदस्य), प्रभाकर केणी (मा ग्रा.प .सदस्य), संदीप म्हसकर (ग्रा.प.सदस्य), किशोर केणी , संजय म्हात्रे सोसायटी पदाधिकारी सुरेश सर्जे साहेब, म्हात्रे साहेब, प्रवीण मगदुम आदी मंडळींच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स च पालन करून झालं.

खरंतर हा रस्ता थोडा खराब झाला होता नागरिकांकडून या बाबत विचारणा होतं होती त्याला अनुसरून ग्रा.प.सदस्या श्रद्धा राजेश केणी या पाठपुरावा करत होत्या असं पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग यांनी सांगितलं. या रस्त्यामुळे अजिंक्यतारा, श्री कृष्णा, वंदन, नंदकीशोर, बसंत, राधाकृष्ण, ओंकार स्वरूपा, ओंमशक्ती आदी सोसायट्यांना रहदारी सुखकर होणार आहे.

आणखीन काही सोसायटीत दिलेले शब्द कोरोना काळामुळे उशीर जरूर होतोय पण दिलेला शब्द नक्क्की पाळला जाईल अस राजेश केणी यांच्या वतीने सांगण्यात आलं. स्वप्नील भुजंग, प्रभाकर केणी, संदीप म्हसकर, किशोर केणी यांचं आभार आपण पूर्ण दिवस उन्हात थांबून काम करून घेतलं.

आम्ही सर्व शेकाप कार्यकर्ते कायम जनतेच्या सोबत असल्याचे राजेश केणी यांनी सांगितलं त्याचबरोबर कोरोना परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने काळजी घ्यावी असं श्री केणी यांनी सांगितलं.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.