सिटी बेल । रामकृष्ण पाटील । नंदुरबार ।
नंदुरबार तालुक्यातील शिवपूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा शिवपूर येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या आदिवासी बांधवांनी लसीकरण करावे.आणि कोरोना बाबत लोकांच्या मधील भीती व गैरसमज दूर व्हावे यासाठी गावात आदिवासी भाषेत गीत ढोलकीच्या तालावर सादर करून जनजागृती केली.
त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ माधव कदम सर तसेच लेखक व गायक भिलाईपाडा येथील मुख्याध्यापक संतोष नांद्रे, शिवपूर येथील ग्रामसेवक लिलेश्वर खैरनार, मुख्याध्यापक रावसाहेब मराठे, कर्मचारी वर्ग, सुधीर पाडवी सरपंच,उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ, अमूल वळवी,संजय वसावे,रविदास वळवी,अनवर वळवी, जालमसिंग वळवी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर,पोलीसपाटील, शिवपूर भजनी मंडळ आणि गावातील सगळे नागरिकांनी लसीकरण जनजागृतीसाठी प्रोत्साहन दिले.
मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लोकांना आवाहन केले, आम्ही सगळे नागरिक लसीकरण करू व कोरोनाला हरवू.अशी शपथ घेतली.ग्रामपंचायत मार्फत लवकरच शिबीराचे आयोजन करण्यात येईल असे सरपंच सुधीर पाडवी यांनी सांगितले.








Be First to Comment