लसीचा दुसरा डोस नागरीकांना तात्काळ उपलब्ध करून द्या – भाई मोहन गुंड
सिटी बेल । केज । प्रतिनिधी ।
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रोगावर मात करण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या लसीची निर्मिती करून रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण होत आहे.
पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिन कंपनीचा लसीचा पहीला डोस केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात देण्यात आला एक डोस घेतल्या पासून 28 दिवसा नंतर दुसरा डोस घ्यावा,पहीला डोस ज्या कंपनीचा घेतला त्यांच कंपनीचा डोस दुसरा ही असनं गरजेचं आहे असे आरोग्य विभागा कडुन सांगण्यात आले.
मात्र दुसर्या डोसा साठी कोवॅक्सिन कंपनीची लस उपलब्ध नाही ती तात्काळ बीड जिल्ह्यात उपलब्ध करुन द्यावी, किमान खबरदारी म्हणून लस घेणार्या नागरीकांना तरी दुसर्या डोस उपलब्ध करुन द्या आशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड भाई मंगेश देशमुख अशोक रोडे यांनी जिल्हा अधिकारी जिल्हा बीड,आरोग्य आधीकारी जिल्हा शल्यचिकित्सक बीड
ताहसिलदार केज तालुका आरोग्य आधिकारी केज यांच्या कडे निवेदनाद्वरे केली आहे,तात्काळ लस न उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.








Be First to Comment