सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातुन क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिरातीने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे.
जीएसएफ जिजेल हे जहाज ऑक्सिजनचे चार कंटेनर घेऊन दुबईतील जेबेल अलीहून दि. 5 मे, 2021 रोजी भारताकडे रवाना झाले होते ते आज जेएनपीटी बंदरात दाखल झाले. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे कंटेनर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येतील आणि सध्याच्या कोरोणा स्थितिवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल. भारत सरकारच्या बंदरे, नौकानयन व जलवाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार विदेशातून मदत घेऊन येणा-या जहाजांना जेएनपीटी बंदरामध्ये नि:शुल्क सेवा दिली जात आहे त्याचबरोबर ऑक्सिजन कंटेनरची विनामूल्य हाताळणी करण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. याबाबत बोलताना जेएनपीटी चे अध्यक्ष श्री.संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले की, कोविड-19 च्या जागतिक माहामारीच्या काळात गेले वर्षभर जेएनपीटी आपल्या भागधारकांसोबत देशातील पुरवठा साखळी निरंतर सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाड़त असून या आव्हानात्मक काळात आम्ही आमचे कर्तव्य बजावून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी वचनबद्ध आहोत.“ गेल्या काही महिन्यांपासून अनेक आव्हानांना सामोरे जात असूनही आम्ही माल हाताळणीमध्ये निरंतर वाढ केली आहे.

एप्रिल 2021 मध्ये, जेएनपीटीने 468,015 टीईयू माल हाताळणी केली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत हाताळणी केलेल्या 283,802 टीईयूच्या तुलनेत 64.91% अधिक आहे.








Be First to Comment