सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील सुकेळी गावातील रहिवासी तसेच रोहा तालुक्यातील प्रतिष्टित समजल्या जाणा-या ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नारायण धोंडु झोलगे (वय – ७३) यांचे शनिवार दि. ८ मे रोजी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रात्री दहा वाजता सुकेळी येथील वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. नारायण झोलगे हे संपुर्ण सुकेळी विभागामध्ये “तात्या” या नावाने परिचित होते. ते रायगडचे खाजदार सुनिलजी तटकरे यांचे खंदे समर्थक मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत असतांना त्यांनी पक्ष वाढीसाठी अपार मेहनत घेतली. राजकारणामध्ये पहिल्यादांच १९९० साली जिल्हा परिषदेमार्फत त्यांची ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणुन नेमणुक करण्यात आली होती. त्यानंतर सन १९९५ साली ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व नंतर सन २०१० मध्ये त्यांनी ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापर्यंत मजल मारत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीची कारभार सांभाळला होता.
महालक्ष्मी कंपनीमध्ये ठेकेदार म्हणुन काम करित असतांनाही त्यांनी अनेक गोरगरिब व आदिवासी तरुणांना रोजगार मिळवुन दिला होता. तसेच सुकेळी विभागातील आदिवासी जनतेवरही अपार प्रेम ठेवत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला होता. पंरतु काही दिवसांच्या अल्पशा आजाराने कै. नारायण झोलगे यांचे निधन झाल्याने ऐनघर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नारायण झोलगे यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, चार विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा मित्र परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि. १७ मे रोजी तर उत्तरकार्य १९ मे रोजी त्यांच्या राहत्या घरी सुकेळी येथे होणार असल्याचे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र संतोष झोलगे यांनी सांगितले.








Be First to Comment