Press "Enter" to skip to content

फसवणुक झालेल्या दांपत्याची न्यायासाठी हाक

जमीन व्यवहारात तब्बल 50 लाखांची फसवणूक : तळोजा पोलिसांना गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी

सिटी बेल । पनवेल ।

पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथील एका प्लॉट मधील साडेचार गुंठे जागेच्या मालकीची जमीन न्यायप्रविष्ठ असतानाही ती विक्री करून ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उलवेतील निशिकांत मोरे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज सादर केला. मात्र ४ दिवस उलटले तरी तळोजा पोलिसांकडून याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत निशिकांत मोरे यांनी अखेर पत्रकार परिषद घेवून न्यायासाठी लढा पुकारला.

उलवे येथे राहणारे निशिकांत मोरे यांनी १७ जानेवारी २०१९ रोजी साडेचार गुंठ्याचा प्लॉट

खरेदी केला. याबाबतचा सातबारा, रजिस्टर कार्यालयातील सर्व नोंदी, जागेची मोजणी अशा सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. भविष्यकाळात उपयोगी पडणारी जागा म्हणून त्यांनी गुंतवणूक केली. मात्र तब्बल दोन वर्षानंतर ते याठिकाणी गेले असता सदर जागा ही तिसऱ्याच माणसांच्या नावे असल्याचे समोर आले.

या जागेमध्ये सन १९९२ सालापासून न्यायालयीन लढाई सुरू असून ही केस

दाभणे आणि भोसले यांच्यामध्ये सुरू होती. मात्र त्यानंतर सदर जागा गेल्या ३० वर्षांमध्ये वेगवेगळ्या लोकांना विकण्यात आली. एकूण साडेआठ एकर जागेमध्ये जवळपास १५० जणांना ही जागा विकण्यात आली.

मात्र २०२० मध्ये न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि सदर जागा ही भोसले यांची असल्याचे सिद्ध झाले.

2 Comments

  1. Nitu M. Pawar Nitu M. Pawar May 8, 2021

    More family var jhalelya anyaya virruddha chya ladhayit mi purn saamil/sahmat aahe..tyana jyanni ashi fasavnuk keli tyana kaaydya chi chapraak milalich paahije aani aaplya nyay devtene lavkaraat lavkar ya More family la nyay milvun dyavi ashi majhi vinanti 🙏aahe..jene Karun asha prakare ajun Kona chi hi fasavnuk honar naahi

  2. Nitu M. Pawar Nitu M. Pawar May 8, 2021

    Ya More family chya anyaya virruddha chya ladhayit mi aani majhi family purnpane sahbhagi aahot..ya More family saarkhya na fasavnarya fruad lokanna kaaydya chi chapraak milalich paahije naahi tar ase lok mokaat sutatil..mhanun mi aaplya nyaay devtela vinaanti🙏karte ki lavkaraat lavkar ya More family la nyaay dyava..jya mule itar Kona chi hi ashi ghor fasavnuk honar naahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.