Press "Enter" to skip to content

बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ कर्जतच्या भाजपा कार्यकर्त्यांनी केला निषेध

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ कर्जत मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी निषेध व्यक्त केला.

“पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने हातात निषेधाचा फलक घेवून निदर्शने करण्यात आली.

कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले, आज बुधवार दि.5 मे रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कर्जत येथे निषेध आंदोलन करण्यात आले, या वेळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किसान मोर्चा कोकण विभाग संयोजक सुनील गोगटे, उद्योग आघाडी संयोजक मंदार मेहेंदळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे, नगरसेविका स्वामींनी मांजरे, विशाखा जिंनगरे, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, शर्वरी कांबळे, सुषमा ढाकणे, शारदा भंगाळे, अभिनय खांगटे, केशव तरे, मारुती जगताप, मनीषा अथनिकर, सरस्वती चौधरी, संदीप म्हसकर, सर्वेश गोगटे, समीर घरलुटे, प्रशांत प्रभुणे, चांदभाई मणियार, बिलाल आढळ तर नेरळ मध्ये तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, नरेंद्र कराळे, नरेश जोशी, रोशन राणे, प्रकाश पेमारे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.