सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना विषाणूंच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सर्वच ठिकाणी लाॅकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली आहे.याचा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे.अशा बिकट परिस्थितीत अनेकांना एक वेळच्या जेवणासाठी जीवाची पराकाष्ठा करावी लागत आहे.यातच खालापूर पोलीस ठाणे व कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्यातील शिरवली आदिवासीवाडी मधील गरजू,निराधार महिला,जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तूंचे किट, मास्कचे वाटप करण्यात आले.

आदीवासी बांधवांना वीस दिवस पुरेल इतक्या जिवनावश्यक वस्तूंचा संच मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक चौक वावर्ले येथील दिपक गणपत पाटील सामाजिक बांधिलकी म्हणून ठिकठिकाणच्या गोरगरीब, गरजूंना जिवनावश्यक वस्तू वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.राज्यभर कानसा वारणा फाउंडेशनचे काम अविरतपणे चालू असते.कोणतीही आपत्ती असो कानसा वारणा फाउंडेशन मदतीसाठी अग्रेसर असते असे संस्थापक दिपक पाटील यांनी बोलताना सांगितले.
वाटप प्रसंगी खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई,कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दिपक गणपत पाटील,माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, संतोष जंगम,समीर पवार,जगदीश वाघ,प्रतीक्षा म्हात्रे आदी उपस्थित होते.वाटपप्रसंगी सोशल डिस्टिंक्शनचे पालन करण्यात आले.








Be First to Comment