Press "Enter" to skip to content

बारवई ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचा धडाका

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

बारवई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पंचवीस वर्षांनंतर खोलंबलेल्या विकास कामांना मार्गी लावण्याचे काम निलेश सुरेश बाबरे यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले आहे. याअगोदर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.हि समस्या निलेश बाबरे यांना नागरिकांनी सांगितली.

यावेळी बाबरे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून पुर्ण होण्यासाठी विकासकामांचा पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून बारवई व बारवई आदिवासीवाडी रस्त्याला पथदिवे बसल्याने परीसर प्रकाशमय झाला. बारवई ग्रामपंचायत हद्दीत बारवई गाव येथे पंचायत समिती सेस फंडामधून काँक्रीट करण रस्ता तसेच समतानगर येथे जिल्हा परिषद समाज कल्याण फंडामधून पेवर ब्लॉक रस्ता तसेच 15 वित्त आयोग मधून समता नगर येथे गटर व संपूर्ण बारवई ग्रामपंचायत हद्दीत पथदिवे लावण्यात आले आहेत.

याप्रसंगी सरपंच अॅड. नियती निलेश बाबरे,उपसरपंच ललिता वामन पडवळ, सदस्य प्रतिक्षा दिपक तारे, सदस्य रूपाली सुशील मुंडे ,सदस्य उषा किसन वाघमारे, सदस्य कीर्ती समीर दळवी, सदस्य अमीर सिताराम वाघमारे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.