Press "Enter" to skip to content

कोरोना लसीकरण केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरु करावे : दत्तात्रेय जांभले

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

सध्या कोरोना आजार हा वेगाने वाढत असताना त्यास रोखण्यास लसीकरण हाच उपाय असल्याने जास्तीत जास्त लवकर सर्व ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायती हद्दीतील नागरिकांचे लसीकरण करून घेतल्यास कोरोना आजारावर मात करता येऊ शकेल असे मत माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांनी व्यक्त केले.

१ मे नंतर १८ वर्षा शपासून ते वृध्द नागरिकांना शासकीय रुग्णालयात मोफत लस देण्यात येणार असे सांगितले आहे.सध्या स्थितीतच मोठ्या प्रमाणात लस केंद्रांवर नागरिक गर्दी करत असल्याचे दिसत आहेत. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिक सुध्दा लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर जाणार असल्याने लस केंद्रावर तान येणार आहे.तरी शासनाने ग्रामपंचायत स्तरावर लस केंद्र सूरू करावे अशी मागणी चांभार्ली ग्रामपंचायतचे मा.उपसरपंच दत्तात्रेय जांभळे यांनी केली आहे.

त्यासाठी लागणारे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी,सुवीधा यांचा खर्च ग्रामपंचायत करावयास तयार असून याने जलद गतीने ग्रामपंचाय हद्दीतील नागरिकांना लस घेता येईल शिवाय कोरोना आजार आटोक्यात येण्यास मदत होइल व नागरिक सुध्दा माणसीक दुष्ट्या तणाव पुर्वक वातावरणात राहणार नाहीत.
ग्रामपंचायत खाजगी प्रशिक्षित कर्मचारी यांन कडून लसी करण करून घेतील येणारा खर्च ग्रामनीधी किंवा १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून मंजूरी द्यावी अशी मागणी चांभार्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे यांनी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.