सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद , पुणे च्या कोकण प्रदेश, रत्नागिरी विभागाच्या मंडणगड तालुक्याचे अध्यक्ष संदीप शंकर तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक ३०/०४/२०२१ रोजी मंडणगड तालुका शाखा, डोंबिवली शहर शाखा आणि विक्रोळी शाखेमार्फत काव्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मंडणगड शाखेमार्फत “जीवन गाणे गातच जावे” ओळकाव्य स्पर्धेचे आयोजन कार्याध्यक्ष अमोल दळवी आणि मंडणगड कार्यकारणी यांनी केले. तर डोंबिवली शहर अध्यक्षा अनिताताई गुजर यांनी डोंबिवली समूहावर “जीवेत शरदः शतम्” या संकल्पनेवर काव्यस्पर्धा घेतली. तसेच विक्रोळी शहर अध्यक्षा प्रणाली म्हात्रे आणि अनिताताई गुजर यांच्या स्वप्नगंध समूहावर “यशवंत भव, किर्तीवंत भव !!” या विषयावर काव्यस्पर्धा घेतली गेली.
सारस्वतांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन एका सरस एक काव्यरचना सादर करुन काव्यमैहफिल सजवली. याबाबत मंडणगड शाखा अध्यक्ष संदिप तोडकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या काव्यस्पर्धेसाठी वरिष्ठ मंडळ शरद गोरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, फुलचंद नागटिळक- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, डॉ. अ.ना.रसनकुटे कोकण प्रदेशाध्यक्ष, डॉ. अलका नाईक कोकण प्रदेश उपाध्यक्षा, हिरकणी राजश्रीताई बोहरा मुंबई प्रदेशाध्यक्षा, बाळासाहेब तोरसकर ठाणे विभाग अध्यक्षा, अनिताताई गुजर डोंबिवली शहर अध्यक्षा,स्मिता धुमाळ, डोंबिवली शहर उपाध्यक्षा,मुग्धा कुंटे डोंबिवली सहउपाध्यक्षा, दीपा वणकुद्रे डोंबिवली सचिव, अविनाश ठाकूर डोंबिवली सहसचिव,उज्वला लुकतुके-डोंबिवली खजिनदार, नवनाथ ठाकूर आजीवन सभासद तसेच प्रणाली म्हात्रे विक्रोळी शहर अध्यक्षा, सविता काळे- विक्रोळी शहर उपाध्यक्षा,योगिता तकतराव उत्तर मुंबई उपाध्यक्षा, हिरामण सोनावणे आजीवन सभासद यांचे मनपुर्वक धन्यवाद व्यक्त केले.
तर अनिताताई गुजर डोंबिवली शहराध्यक्षा आणि प्रणाली म्हात्रे-विक्रोळी शहराध्यक्षा यांचेही या निमित्ताने विशेष आभार मानले.
संदीप तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सारस्वतांच्या लेखणीला प्रोत्साहन म्हणून आयोजित काव्यस्पर्धांमुळे सारस्वतांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन सर्वांनी सरांच्या भावी साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याबद्दल संदीप तोडकर सरांनीही सर्व सारस्वतांचे आभार मानले.








Be First to Comment