रसायनी पोलिस स्टेशन आणि व्यापारी असोसिएशनचा उपक्रम
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे.यातच रसायनी पोलिसांनी एक हात मदतीचा पुढे करत व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृध्द नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी व स्वच्छता या दृष्टीने आरोग्यास उपयुक्त अशा वस्तूंच्या किटचे वाटप केले.
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाववाडी येथील मानव आशा सेवा होम संचलित वृध्दाश्रमाला भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत येथील वृध्द नागरिकांची विचारपूस पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केली व त्यांना धीर दिला.यानंतर वृध्दाश्रमातील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी व स्वच्छता यादृष्टीने च्यवनप्राश,नायसिल पावडर,विक्स वाॅटल,मास्क, खजूर, मणुके,सॅनिटायझर आदि वस्तूंच्या किटचे वाटप पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून आले.तलेगाववाडी येथील मानव आशा सेवा होम या वृध्दाश्रमातील नागरिकांना रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे व व्यापारी असोसिएशन यांनी वृद्धाश्रमातील वृध्दांना भेटवस्तूंचे किट वाटप केल्याने वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.

वाटप प्रसंगी रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, पोलिस मंगेश लांगी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी, सचिव अमित शहा, सचिन मालकर,सतीश ओसवाल, विलास ओसवाल आदी उपस्थित होते.








Be First to Comment