विविध सेवाभावी संस्थांना १२०० किलो तांदुळ, ६०० किलो गहु, ६० किलो दाळ, ४५ किलो तेल, १० किलो पीठ व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सिटी बेल । खांदा कॉलनी ।
सध्याची कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यातुन बंद पडलेले व्यवसाय व नोकरी यामुळे सामान्य गरीब लोकांचे अत्यंत हालाकिची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्त नवी मुंबई बिपीन कुमार सिंग यांच्या संकल्पनेतुन तसेच पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ पनवेल शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस ठाणे देवीदास सोनवणे यांनी व त्यांच्या सहका-यांनी विविध सामाजिक संस्थांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यात १) बालग्राम आश्रम से १२ खांदाकॉलनी या अनाथ लहान मुलांचे आश्रमात २) मंगलाश्रय सामाजिक संस्था से ७ खांदा कॉलनी, या अनाथ मुलींचे आश्रमाला तसेच ३) से ५ नवीन पनवेल येथील गुरुद्वरा येथे सहा पोलीस आयुक्त पनवले नितीन भोसले पाटील यांचे हस्ते एकुण १२०० किलो तांदुळ, ६०० किलो गहु, ६० किलो दाळ, ४५ किलो तेल, १० किलो पीठ व इतर जीवनावश्यक व शाळेच्या वस्तु मदत स्वरूपात देण्यात आल्या.








Be First to Comment