Press "Enter" to skip to content

वणवे लावून वनसंपदा नष्ट करणा-यांवर वनविभाग कारवाई करेल का ?

वृक्ष प्रेमी राजू पोतदार यांचा सवाल

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

वणवे लावून वनसंपदा नष्ट करणा-यांवर वनविभाग कारवाई करेल का ? असा प्रश्न वृक्ष प्रेमी राजू पोतदार यांनी उपस्थित केला आहे. इ. स. 2019 पासून सुरू झालेल्या व इ.स.2020 सालापासून जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या मार्च 2021 पासून आपल्या देशात तसेच महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे रूग्ण संख्या कित्येक पटीत वाढली आहे तसेच रूग्ण मृत्युमुखी पडण्याची संख्या भयानक वाढली आहे. हे सर्व आटोक्यात येण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. आपल्याला पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले आहे.

हॉस्पिटलमध्ये पैसे असुनही बेड तसेच ऑक्सिजन सिलींडर उपलब्ध न झाल्याने मृत होणाऱ्या व्यक्तींचा आकडा खुपच वाढत आहे. हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी बघत असतांना आपल्याला मोफत (फुकट) ऑक्सिजन (प्राणवायू) पुरविणा-या वृक्षांची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल तसेच लावण्यात येणाऱ्या वणव्यांमुळे (आगीमुळे) नष्ट होत असलेल्या वनसंपदेमुळे वातावरणातील आॉक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे.

आज सर्वत्र डोंगरांना तसेच जंगलसदृष्य झाडे असलेल्या भागात मुद्दामच वणवे लावून हि वनसंपदा नष्ट करण्यात येत आहे.

एक माणूस एका दिवसाला तिन सिलेंडर भरतील एवढा झाडांमुळे मिळणारा ऑक्सिजन वातावरणातुन श्वसनावाटे मोफत (फुकट) घेत असतो हे आपल्या सर्वांना माहीत असतांनाही सर्वत्र तसेच आपल्या रायगड जिल्ह्यात व कर्जत तालुक्यात सर्वत्र डोंगरांवर वणवे लावून नंतर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे.

प्रतिवर्षी कित्येक कोटी रूपये खर्च करून मनुष्यबळ वापरून शासन झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहे, आपलेच लोक स्वतः च्या स्वार्था साठी वणवे लावून नंतर पाने झडलेल्या मोठ्या वृक्षांबरोबर लहान झाडांची तोड करून जळणासाठी तसेच इतर कामासाठी साठे करत आहेत, असे साठे करणा-यांवर गावागावात तपासणी करून प्रशासन तसेच वनविभाग आतातरी कायदेशीर कारवाई करेल का? असा प्रश्न कर्जत येथील वृक्ष प्रेमी राजू पोतदार यांनी केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.