Press "Enter" to skip to content

उलवे शिवसेनेच्या वतीने २ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

सिटी बेल । उलवे । सुनिल ठाकुर ।

वाढत्या रुग्ण संख्येमुळे सध्या संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने उरण विधान सभा क्षेत्रात विभागवार रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम पाटील यांनी सांगितले.

शिबिराचे उद्घाटन मावळ लोकसभा क्षेत्र खासदार श्रीरंग बारणे करणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर भूषविणार आहेत.

याप्रसंगी विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून रायगड जिल्हा शिवसेना संघटक सदानंद भोसले, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, पनवेल तालुका संघटक मर्फी क्रीयाडो, उप तालुका प्रमुख हनुमान भोईर, विभाग प्रमुख सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिबीर यशस्वी करण्यासाठी वहाळ शिवसेना शाखा प्रमुख सुधीर घरत, सेक्टर २० शाखा प्रमुख सुरी गौर, ऋषि म्हात्रे, शिवाजीराव पालांडे, संघटक चंद्रकांत गुजर, उद्योजक सुरेश पाटील, ज्ञानदेव पोळ व अन्य पदाधिकाऱ्यांसह मेहनत घेत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.