Press "Enter" to skip to content

तळोजा इंडस्ट्रील असोसिएशनतर्फे परमशांतीधाम वृद्धाश्रम ट्रस्ट मदतीचा हात

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या माध्यमातून त्या परिसरात असणार्‍या परमशांती वृद्धाश्रम ट्रस्टला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

राज्यात करोना महामारीने थैमान घातले असून अनेक   घटक जगण्यासाठी  जीवनावश्यक अन्न धान्य सारख्या  गरजे पासून  वंचित असल्याने असंख्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे म्हणून टीआयएने  स्थानिक हद्दीतील तळोजा येथील   वयोवृद्ध  जेष्ठ नागरिक आपलं असह्य  जीवन जगत आहेत व त्या लोकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तू, आहार व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करुणा महामारी मध्ये अत्यंत आवश्यक असणार्‍या साधनांचा उपयोग व्हावा म्हणून  तळोजा औद्योगिक असोसिएशन ने संघटनात्मक सहकार्याने संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली उपक्रम  राबविला.

त्यात प्रामुख्याने वृद्धाश्रमात जाऊन निर्जंतुकीकरण सॅनिटायझर, मास्क, फेस कवर हँडवॉश लिक्विड, शरीर तापमान यंत्र, प्राथमिक उपचार किट, स्टीमर यंत्र अशी साधने दिली, खाद्यपदार्थांमध्ये रोज लागणार्‍या, कडधान्य मसाले खाद्यतेल, ड्रायफूट ,फळे , औषधे अशा विविध प्रकारच्या जीवन आवश्यक वापरणार्‍या खाद्यपदार्थांचे पॅकेट त्यांना शारीरिक ताकत मिळावी म्हणून नियोजित पद्धतीने देण्यात आले तळोजा असोसिएशनच्या सामूहिक संघटनांमध्ये अशा प्रकारचे सामाजिक कार्य टीआयएनेहमी आपले कर्तव्य समजून करते. समाजाला सहकार्य करणे साठी  तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या उद्योगसमूहातील वसुधा केमिकल, सिंधू ऑर्गानिक, बीजी इंटरप्राईजेस, फोर्टन स्टील, विनायक ऑरगॅनिक, प्रीमियम फुड्स, सिस्को रिसर्च, एशियन पेंट, एस एस के एम स्टील ,आय जी पी एल ,वॉल टेक, जे पी फोर्ट ,इसके डाय केमिकल, पी एन एस इंजीनियरिंग ,मैसूर अमोनिया ,की मित्सू ,बोटली प्रॉडक्ट, सिक्कीम लॅब, मीनाक्षी फिशर्स, फ्याबीला, मिस्टर भाऊनेश्‍वरी गणेशन. टीआयए औद्योगिक असोसिएशन ने संघटनात्मक सहकार्याने संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली उपक्रम राबविला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.