Press "Enter" to skip to content

पोलिसांनी केले वेषांतर आणी विनाकारण फिरणाऱ्यांवर आले गंडांतर

कामोठे पोलीसांनी लढवली युक्ती : विनाकारण फिरणार्‍यांवर वेषांतर करून पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

90 लोकांकडून केला 45 हजारांचा दंड वसूल

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

राज्यात कडक निर्बधाची घोषणा करून देखील, विना कारण रस्त्यावर फिरणार्‍या तसेच क्रिकेट, व्हॉलीबाल सारखे खेळ खेळणार्‍यावर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अनेक वेळा गणवेशात पोलीस कारवाई करण्यास आल्यावर नागरिक पळापळ करतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही हे टाळण्यासाठी आता पोलीस खाजगी वाहनांमध्ये तसेच वेषांतर करून सकाळी संध्याकाळी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, खारघर, कामोठा, कळंबोली, कामोठे आदी पोलीस ठाण्यामार्फत आता ही कारवाई सुरू करण्यात आली आाहे. नुकतेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहती मधील 90 रहिवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या मध्ये महिला आणि वयोवृद्धाचा समावेश आहे. या कारवाई नंतर अनेकांनी पोलिसां सोबत हुज्जत घातल्याचे प्रकार देखील घडला आहे.

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 1 मे पर्यत कडक निर्बधाची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वगळून इतर व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. असे असताना देखील अनेक रहिवाशी विनाकारण रत्यावर फिरताना दिसून येत आहे. अश्या निर्बधाची पाय मल्ली करण्यावर सध्या पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहतीमध्ये इव्हीनिग वॉक साठी घरातून बाहेर पडणार्‍या तसेच मोकळ्या मैदानात क्रिकेट मॅच आणि व्हॉली बॉल खेळणार्‍याना अटक करुन त्याच्यावर कारवाई केली आहे. जवळपास 90 हुन अधिक रहिवाशियावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये महिला आणि मुलीचा सहभाग आहे. त्या सोबत वयोवृद्ध देखील दिसत आहे. या सर्वांना कामोठे पोलीस ठाण्यात आवारात उभा करून त्यांना समज देण्यात आला तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून 500 रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.