Press "Enter" to skip to content

महेश गुरव यांची आखिल गुरव समाज संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड

सिटी बेल । कळंबोली । प्रतिनिधी ।

शिवसेना वाहतूक सेल रायगड जिल्हा अध्यक्ष महेश गुरव यांची  अखिल गुरव समाज संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल गुरव समाज संघटना कार्यक्षम राष्ट्रीय अध्यक्ष मा.आण्णासाहेब शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली मा.अमोल अरुण गुरव व रायगड जिल्हा अध्यक्ष अमोल अरुण गुरव अध्यक्षतेखाली त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. गुरव यांच्या रूपाने युवा नेतृत्व आणून समाजसेवेचे कार्य पुढे नेवून समाज पुढे जाण्यास मदत होणार आहे असा विश्वास गुरव समाजाने व्यक्त केला आहे.   

हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा महेश गुरव यांच्यावर मोठा  प्रभाव आहे. या विचारातून त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले आहे. वाढत्या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेला दिलासा देताना महेश गुरव स्वखर्चातून घरोघरी जावून दरवर्षी आरोग्य तपसणीची सेवा देत आहेत. कोरोना महामारीत लाँकडाऊनच्या काळात रहिवाशीना मोफत सिलेंडरचे वाटप करण्यात आले. कोरोना साथीत रुग्णाना दिलासा देताना हाँस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे, त्यांच्या बिलात सवलत देणे, त्यांच्या येण्या-जाण्याची सोय करणे, त्यांना अडचणीत मदत करणे,  वाहतूक सेलचे रायगड अध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने ते ट्रान्सपोर्टरना अहोरात्र मदत करत मेहनत घेत आहेत. त्यांच्या कामाची पोहचपावती म्हणून गुरव समाजाने त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देवून युवाकांना पुढे आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

समाजाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थ ठरविताना नोकरी निमित्त विखुरलेला समाजाला एकत्र आणण्याचे माझे पहिले काम असले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निवडीबद्दल अखिल गुरव समाज संघटना कार्यक्षम राष्ट्रीय अध्यक्ष मा.आण्णासाहेब शिंदे, रायगड जिल्हा अध्यक्ष  मा.अमोल अरुण गुरव यांनी मा.महेश गुरव यांच्या निवड झाल्याबद्दल त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.