Press "Enter" to skip to content

खालापूरमधील शिवभोजन थाळीची वर्षपूर्ती

कोरोनाच्या काळात गोरगरिबांसाठी ठरली जीवनदायिनी

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी राज्यांमध्ये ठीकठिकाणी शिवभोजन केद्रांची स्थापना करून खालापूर शहरामध्ये २३ एप्रिल २०२० रोजी हॉटेल गौरी संचलित मोफत शिवभोजन केंद्राचे कर्जत खालापुरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. या शिवभोजन थाळीला १ वर्ष पूर्ण होत असून ही शिवभोजन थाळी कोरोनाच्या काळात गोरगरिबांची जीवनदायिनी ठरली असून या उपक्रमाला खालापूर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे हॉटेल गौरीचे मालक धर्मेंद्र पिंगळे यांनी बोलताना व्यक्त केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच राहिल्याने हातावर पोट असणारे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली होती .याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून गोरगरीब जनतेसाठी मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती आणि ही थाळीच गोरगरीबांसाठी जीवनदायीनी ठरली आहे. या शिवभोजन केंद्रातील मोफत थाळीमध्ये वरण, भात, भाजी, चपाती अशा पदार्थांचा समावेश असून हे जेवण घरगुती पद्धतीचे, रुचकर आणि चविष्ट असल्याचे नागरिक सांगत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.