Press "Enter" to skip to content

शेकाप तर्फे कळंबोली येथे 1 मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

सिटी बेल । कळंबोली ।

शेतकरी कामगार पक्ष कळंबोली शहर व पुरोगामी युवक संघटना कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 1 मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक.व माध्यमिक विद्यालय से .1ई नविन इमारत कळंबोली येथे वेळ.स.9.00 ते दु.2.00 पर्यंत हे शिबीर संपन्न होणार आहे.

आपण सारेच सध्या कोरोना माहामारीला सामोरे जात आहोत कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक बेड,ऑक्सिजन, आवश्यक औषधे ,रक्त, प्लाझ्मा वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आपलेच मित्र व नातेवाईक, याना मृत्यूस सामोरे जावेच लागत आहे. बेड,ऑक्सिजन, औषध आपण पैशाने खरेदी करू शकतो .काही प्रमाणात रक्त ही खरेदी करू शकतो परंतु सध्याची परिस्थिती पाहता सर्व सामान्य रूग्णांना हे शक्य होत नाही. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन शासन देखील करत आहे.त्या नुसार शेतकरी कामगार पक्ष /पुरोगामी युवक संघटना कळंबोली च्या वतीने आपणास आवाहन करणे येते की जास्तीत जास्त रक्त दात्यानी रक्तदान करून सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती.

गोपाळ रामा भगत
चिटणीस -शे.का.पक्ष कळंबोली शहर
नगरसेवक -पनवेल महानगरपालिका

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.