Press "Enter" to skip to content

रसायनी कोविड रुग्णालय न झाल्यास अजित सावंत यांचा उपोषणाचा इशारा

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवलपास 53000 आहे.शिवाय परीसरातील इतर गावे पाहता लोकसंख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे.परंतु अद्याप परिसरात एकही कोविड रुग्णालय नाही.येथील कोरोना पाॅजिटीव्ह नागरिकांना उपचारासाठी पनवेल, नवी मुंबई, मुंबई येथे जावे लागते.यातच वेल व पैसा खर्च होत असून काही नातेवाईकांना हाॅस्पिटल आवारात आपल्या रुग्णांसाठी उपस्थित असताना कोरोनाची लागण होत असल्याची अनेक उदाहरणे ऐकावयास मिळत आहेत.परिसरातील एखाद्या रुग्णाची गंभीर परिस्थिती झाल्यास रुग्णांना रुग्णालयात आॅक्सिजन बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.यातच वेल वाया जात असल्याने काहींना आपलं प्राणही गमवावे लागले आहे.

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग असल्याने या परिसरातील लोकसंख्या पाहता कोविड रुग्णालय होणे गरजेचे आहे.यासाठी अजित सावंत यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्याकडेही मागणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
दरम्यान रसायनी परीसरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोविड परिस्थिती चिंताजनक आहे.परिसरात कोविड रुग्णालयाची गरज असल्याने रसायनीत कोविड रुग्णालय न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे अजित सावंत यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.