Press "Enter" to skip to content

खोपोली सुभाष नगर ग्रामस्थांच्या रस्त्याचा संघर्षाला यश

डांबरीकरण कामाला सुरवात,रहिवाशी नागरिकांमधून समाधान

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

गेले दिड वर्षा पासून सुभाष नगर ग्रामस्थ ५० वर्ष जुना पूर्वापार रेल्वे गेट/ मस्कॉ गेट ते जाधव मामा यांचा घरा परियाण्याचा रास्ता जाण्या येण्याकरिता कायमावरूपी राहावा यासाठी संघर्ष करत होते.

खोपोली नागरपरिषेदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १मधील सुभाष नगर येथील सर्व ग्रामस्थांनी होणाऱ्या नवी पर्यायी रस्त्याला विरोध करत जुन्याच रस्त्याची मागणी करीत या रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थानी केल्याने दीड वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आल्याने येथील ग्रामस्थामध्ये समाधानांची भावना व्यक्त होत आहेत.

खोपोली शहरातील सुभाष नगर येथील जुन्या पूर्वापार रस्त्याचे नूतनीकरण ५० वर्षांपूर्वी झाले होते त्यानंतर या रस्त्याबाबत मधल्या काळात पर्यायी रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते मात्र येथील ग्रामस्थांनी या प्रस्तावाला विरोध करीत नगरपरिषदेचे मुख्यधिकारी गणेश शेटे यांना ११ डिसेंबर २०१९ रोजी दिले होते. सुभाषनगरचा जुना पूर्वापार रस्त्याचे डंबरीकरण करण्यात यावे व या प्रभागातून सलग तीन वेळा निवडुन येणारे व या परिसराचा विकास करून नावारूपास आणारे खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. सखाराम गेणु जाधव याचे नाव या रस्त्याला देऊन नामकरण करण्यात यावे या प्रमुख तीन मागण्या केल्या होत्या. अडीच- तीन हजार पेक्षा जास्त लोक संख्या असलेल्या सुभाष नगर मध्ये महिंद्रा (मस्कॉ) कंपनी मधील काम करत असलेला कामगार, रिटायर्ड कामगार यांचाच घरातील सदस्य राहतात.

याचा कामगारांचा घरातील मुले कंपनीच्या जे.सी.एम.एम स्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत. शिक्षणासाठी व नोकरी साठी बाहेर जाणाऱ्या माता भगिनींना नवीन पर्यायी रस्ता हा आड मार्ग होता तोच जुना पूर्वापार रस्ता गुडलक ते सुभाष नगर कायम रहदारी असल्यामुळे सुरक्षित आहॆ. नवी पर्यायी रस्त्यावरून गावा परियांत नगर परिषदेची बस सेवा, उद्या एखाद्या आपत्कालीन परिस्तिथी मध्ये रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडची गाडी या अरुंद रस्त्या मुळे आतमध्ये येणे शक्य नव्हते आणि बाहेरून जाणाऱ्या या रस्त्याचे रिक्षाचे भाडे येथील सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. गेले दिड वर्ष या विषय संदर्भात मुख्यधिकारी यांची भेट घेऊन तसे स्मरण पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला.

अखेर या प्रमुख मागण्यामधील रस्त्याच्या डांबरीकारण कमला सुरवात करण्यात आली आहॆ.या रस्त्यांसाठी ९४ लाख २३ हजार २९४ रूपये खर्च येणार आहे. संघर्षाचा हा लढा सुरूच ठेवला आणि त्याला अखेर यश मिळाले. याकरिता मोलाचे सहकार्य करणारे नगर परिषदेचे मुख्यधिकारी गणेश शेटे, महिंद्रा सॅनियो कंपनीचे व्यवस्थापक, स्थानिक नगरसेवक मंगेश दळवी व भाजप नगरसेवक तुकाराम शेठ या रस्त्याचा कामाकरिता सहकार्य केल्या बद्दल सुभाष नगर ग्रामस्थांचा वतीने येथील युवा नेते राहुल सखाराम जाधव यांनी ग्रामस्थानच्या वतीने आभार व्यक्त केले आहॆत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.