सिटी । उरण । घनःश्याम कडू ।
राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे अकरावीसह डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची गुणवत्तेची कसोटी कशी लावली जाणार, प्रवेशाच्या स्पर्धेसाठी काय निकष असणार, तसेच प्रवेशाच्या निकषातही यंदा बदल केले जाणार का, याबद्दल विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी ही चुरस कमी करण्यासह विद्यार्थ्यांचे योग्य आणि अचूक मूल्यांकन व्हावे. तसेच प्रवेशाचे निकष ठरविताना सरकारने पुढील शैक्षणिक वर्षाचा आणि प्रवेशाच्या जागा वाढविण्याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावला जाणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पाहून पुढील प्रवेशाची दिशा ठरवावी लागणार आहे.
Be First to Comment