सिटी बेल । कळंबोली । विकास पाटील ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे नगरसेवक गोपाळ भगत यांच्या प्रयत्नातून कळंबोली सेक्टर 3, इ 1 टाईपमधील इमारती निर्जंतुकिकरण करण्यात आल्याने कोरोनाच्या दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या महामारीने पनवेलमध्ये थैमान घातले असून नागरिकात भीतीचे वातावरण आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण ही पालिकेची डोकेदुखी असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेने इमारती निर्जंतुकिकरण करण करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे. कोरोनाबरोबर शहरात डासांचा उद्रेक वाढला असून मलेरिया व डेग्यूचीही भीती निर्माण झाली आहे . तेव्हा कळंबोली नागरिकांनी नगरसेवक गोपाळ भगत यांच्याकडे औषध फवारणी करण्याची मागणी केली होती त्याप्रमाणे भगत यांच्या उपस्थितीत आज कळंबोली सेक्टर 3, इ 1 टाईपमधील सर्व इमारती निर्जंतुकिकरण करण्यात आले.
नगरसेवक श्री गोपाळ भगत यांनी जातीने लक्ष घालून फवारणी करण्यात आली त्याबद्दल त्यांचे असोसिएशनचे सल्लागार पी एस हातेकर यांनी सोसायटी च्या वतीने आभार व्यक्त केले आणीबाणी च्या लाॅकडाऊन च्या काळात श्री गोपाळ जी भगत यांनी सहकार्य करून मदत केली त्याबाबत त्यांचे वतीने आभार मानले.
पालिका आरोग्य विभागाचा अजब कारभार
कळंबोली शहर हे कोरोनाचे हाँटस्पाँट शहर बनले असून या शहरातील दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे नागरिकात भितीचे वातावरण आहे. तेव्हा ज्या इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत असा इमारती निर्जंतुकिकरण करण्यात येतात पण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून फवारणी ठराविक ठिकाणी केली जात आहे. तर इमारतीच्या अे विंगला फवारणी करून बी विंगला फवारणी न करता त्या रहिवाशीना कोरोनाच्या संकटात टाकत असल्याचा अजब प्रकार कळंबोली आरोग्य विभागात सुरू आहे. यातून कोरोनाला कसे हद्दपार होणार असा प्रश्न नागरिक करत आहेत.
शहरात डासांचा उद्रेक वाढला असून कोरोनापाठोपाठ मलेरिया व डेंगीचीही भीती निर्माण झाली होती. तेव्हा नागरिकांनी नगरसेवक गोपाळ भगत यांच्याकडे औषध फवारणी करण्याची मागणी केली होती त्याप्रमाणे भगत यांच्या उपस्थितीत आज कळंबोली सेक्टर 3, इ 1 टाईपमधील सर्व इमारती निर्जंतुकिकरण करण्यात आले नगरसेवक श्री गोपाळ भगत साहेब यांनी जातीने लक्ष घालून फवारणी करण्यात आली त्याबद्दल त्यांचे असोसिएशनचे सल्लागार पी एस हातेकर यांनी सोसायटी च्या वतीने आभार व्यक्त केले आणीबाणी च्या लाॅकडाऊन च्या काळात श्री गोपाळ जी भगत यांनी सहकार्य करून मदत केली त्याबाबत असो च्या वतीने आभार मानले.








Be First to Comment