Press "Enter" to skip to content

ऊन्हाळी हंगामातील भातशेती बहरली : शेतकरीवर्ग समाधानी

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

कालव्याच्या पाण्यावर आधारित केली जाणारी ऊन्हाळी हंगामातील भातशेती चांगलीच बहरल्याने शेतकरीवर्ग समाधानी दिसत आहे.

रोहे तालुक्यातील डोलवहाळ बंधा-याच्या माध्यमातून कालव्याच्या सहाय्याने काही भागात ऊन्हाळी हंगामातील भातशेती पिकविली जाते.ऊन्हाळी हंगामातील भातशेतीचे पिक हे शेतकरीवर्गाचे हातात असल्याने ते त्यांना चांगले परवडते.तर कालव्याच्या माध्यमातून शेतीला आवश्यक पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याचेही योग्य प्रकारे नियोजन करून आपल्याला आवश्यक असणारी पिके सहजपणे पिकविली जातात.

साधारणपणे डिसे.महिन्यात कालव्याचे पाणी उपलब्ध झाले तर साधारणपणे नव्वद ते एकशेवीस दिवसात भातपिके तयार होऊन कापणी लायक होतात. तर कधी पाणी उशिरा मिळाल्याने हंगाम तर पहिल्याच येणाऱ्या मोसमी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. परंतू या वर्षी पाटबंधारे विभागाकडून योग्य वेळेत पाण्याचे नियोजन झाल्याने भातशेतीही योग्य पद्धतीशे बहरल्याने शेतकरी वर्ग चांगलाच समाधानी दिसत आहे. तर अधून मधून दिसणा-या ढगाळ वातावरणामुळे अवकळी पावसाची टांगती तलवारही त्यांच्या डोक्यावर कायम आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.