Press "Enter" to skip to content

अवकाशात पहावयास मिळाले चंद्राचे खळे, अनेकांनी घेतला आनंद

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

२३ एप्रिल रोजी रात्री ८ ते ९.३०या दरम्यान अवकाशात एक अनोखा आणि तेजमय आकाराचा वर्तुळाकृती गोळ तसेच चंद्राच्या भवती निर्माण झालेले खळे अवकाश प्रेमींसह अनेकांनी हा पाहण्याचा आनंद घेतला एवढेच नव्हे तर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी लहान थोरांसह चंद्र वर्तुळ पाहण्याचा आनंद घेतला .

चंद्राचे खळे याला चंद्राचे विवर म्हणतात आपल्याकडे कडे चंद्राचे खळे असे म्हणतात.चंद्राच्या भोवती तंतुमय ढग जमल्याने त्यातून चंद्राची पसरणाऱ्या किरणांचे वक्रीभवन २२ अंशात होत हे खळे तयार झालेले पहावयास मिळाल्याने अनेकांनी उघड्या डोळ्यांनी व नजरेतून पाहून आनंद घेतला तसेच २० हजार फूटाच्या आसपास असणारे पांढरे ढग आपल्याला दिसत नाहीत, पण जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या ढगांमधून जातो त्यामुळे आपल्याला चंद्राच्या भोवती एक प्रकाश वलय दिसू लागत होते आणि ग्रामीण भागातील गावात एकाच्या नजरेत येताच हा हा म्हणता साऱ्यांच्याच मोबाईल व्हाट्सपच्या माध्यमातून तातकाल सर्वत्र मेसेज व्हायरल होताक्षणीच नागरिकांच्या नजरा अवकाशाकडे भिडल्या आणि गोल चंद्राच्या भोवती चंद्र किरणांचे खळे पाहण्याचा आनंद लुटला .

दुर्मिळ आणि खूप कमी वेळा पहावयास मिळणारे चंद्राचे खळे : विशाल कुंभारे खोगोल शास्त्रज्ञ पुणे

या ढगांतील हिमकणांमुळे जी विविध प्रकारची तेजोवलये तयार झालेली दिसतात त्यामध्ये २२° चे खळे (Halo) हे एक सुंदर दृश्य आहे.
त्याला वैज्ञानिक भाषेत लुनार किंवा मून हॅलो इफेक्ट म्हणतात (lunar halo effect) .
आज रात्री सर्वानी हा आनंद घेतला. हा नजारा खूप कमी वेळा बघावयास मिळतो.
चंद्राचे किरण जेव्हा ह्या ढगातील सूक्ष्म पण लक्षावधी षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे वक्रीभवन होते आणि असे खळे दिसते. २२° खळे हे बरेच मोठे म्हणजे आपला हात आकाशात सूर्य किंवा चंद्राच्या दिशेने पूर्ण लांब केला असता पसरलेल्या तळहाताएवढी अंदाजे त्रिज्या असेल तेवढे दिसते. असे खळे हे सर्वसाधारणपणे आकाशात बऱ्याच वेळा म्हणजे इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा दिसते असे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.