Press "Enter" to skip to content

खारघर मधील गुरुद्वारा तर्फे ऑक्सिजन सिलेंडर वाटप

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णांना लागणारी ‘ऑक्सिजन’ची गरज ओळखून खारघर मधील गुरुद्वारा तर्फे मिनी आणि मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत.

‘ऑक्सिजन सिलिंडर’ची आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाचा कोरोना अहवाल सादर केल्यास गुरुद्वाराकडून विनामूल्य मिनी आणि मोठा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिला जात आहे. खारघर मधील गुरुद्वारा तर्फे दोन दिवसात 25 मिनी ऑक्सिजन सिलिंडर तर 2 मोठे ऑक्सिजन सिलिंडर विनामूल्य वाटप करण्यात आले.

दरम्यान, ‘मिनी ऑक्सिजन सिलिंडर’ची गरज असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी खारघर मधील सेंट्रल पार्क शेजारी असलेल्या गुरुद्वारा मध्ये संपर्क साधावा, असे आवाहन खारघर गुरुद्वारा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.