Press "Enter" to skip to content

  पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व इस्पितळांचे फायर ऑडिट करा
– नगरसेवक सतिश पाटील

      पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व इस्पितळांचे फायर ऑडिट करा

नगरसेवक सतीश पाटील यांची आयुक्तांच्या कडे मागणी 

         नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीचे 22 बळी,नुकत्याच झालेल्या विरार हॉस्पिटल अग्निकांडात 13 निष्पाप बळी,यापूर्वी भंडारा आणि भांडुप येथे लागलेल्या हॉस्पिटल मधल्या आगी म्हणजे कोरोना कालखंडातील दुष्काळात आलेले तेरावे महिने आहेत. या घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती पनवेल महानगरपालिका हद्दीत होऊ नये यासाठी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी पालिका हद्दीतील सर्व इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याची मागणी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
       कोरोना विषाणूची दुसरी लाट भयानक परिस्थिती निर्माण करत आहे. एका बाजूला विषाणू संक्रमणाशी लढत असताना दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. या संघर्षमय परिस्थितीमध्ये पेशंट मॅनेजमेंट करत असताना अपघात होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाण सुद्धा तितकेच वाढत आहे. असे अपघात होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश मोहन पाटील यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहून पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व इस्पितळांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी हॉस्पिटल्समध्ये असणाऱ्या अतिदक्षता विभागातील विद्युत उपकरणांचे देखील परीक्षण केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच अतिदक्षता विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे वेळी नियोजन करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. वेळोवेळी माँक ड्रिल घेऊन डॉक्टर,परिचारिका आणि अन्य कर्मचारी वृंद यांस अधिक सक्षम बनविण्याचे कामी महानगरपालिकेने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.